*कोकण Express*
*राणे समर्थक कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विजय हळदिवे बाळासाहेबांची शिवसेनेत दाखल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालूक्यात सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या फोंडाघाट ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी येथील प्रमुख पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी कंबर कसली असून ग्रामपंचायत निवडणूक प्रचारच्या सुरुवातीलाच बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या संजय आग्रे यांनी नितेश राणे यांना धक्का देत राणे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य विजय हळदीने यांचा बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करून घेतला
फोंडाघाट ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर फोंडाघाट मधील भाजपा पक्ष शिवसेना पक्षाच्या उभ्या फुटीनंतर बाळासाहेबांची शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या प्रमुख तीन पक्षांची मोर्चे बांधणी जोरात सुरू झाली असून गुप्त बैठकांचा सपाटा सुरू आहे दरम्यान सरपंच पद जनतेतून थेट निवडून द्यायचे असल्याने तिन्ही पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे सरपंचपद खुल्या गटासाठी आरक्षित असल्याने तिन्ही पक्षाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे.

