घोणसरी भाजपा आणि वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

घोणसरी भाजपा आणि वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

*कोकण Express*

*घोणसरी भाजपा आणि वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न*

*१०६ रुग्णांची केली मोफत तपासणी,३५ रुग्णांच्या होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया*

*भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे आणि भाजपा तालुका उपाध्यक्ष छोटू पारकर यांचे यशस्वी आयोजन*

भारतीय जनता पार्टी घोणसरी आणि भ.क.ल.वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले.या शिबिरात १०६ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.यामध्ये ३५ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार आहे.शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांची पहिली बॅच २५ नोव्हेंबर रोजी घोणसरी येथून डेरवण साठी रवाना होणार आहे.

यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष छोटू पारकर, घोणसरी सरपंच मृणाल पारकर,उपसरपंच विलास मराठे, वालावलकर हॉस्पिटलचे डॉ.सौरभ, समाजसेवक श्री.धुमाळ,समाजसेविका श्रीमती कांबळे, ग्रा.पं.सदस्य प्रसाद राणे, कुर्ली ग्रा.पं.सदस्य सूरज तावडे, दूध संस्था चेअरमन गणेश परब,सोसायटीचे ज्येष्ठ संचालक मॅक्सी पिंटो,सोसायटी संचालक विश्वजित राणे, भाजपा ओबीसी सेल शक्तीकेंद्र प्रमुख दत्ताराम गुरव,लवू सावंत,युवा मोर्चा बूथ अध्यक्ष लक्ष्मण परब,विठ्ठल बागवे,दिपक मराठे,विजय एकावडे, अनंत गुरव,संतोष(बाबू)राणे, व्हेलेरियन पिंटो,प्रकाश हजारे आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजप तालुका सोशल मीडिया सदस्य नितीन पारकर,भाजपा बूथ अध्यक्ष बाबू राणे, संजय शिंदे,अनिल राणे,गणेश एकावडे,संदेश जाधव,दिवाकर कारेकर आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!