*कोकण Express*
*कुडाळ प्रांताधिकारी पदी कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करा*
*आ. वैभव नाईक यांची ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे मागणी*
कुडाळ येथील उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) हे पद गेले काही महिने रिक्त असून त्यामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत असल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पत्राद्वारे राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे याकडे लक्ष वेधत लवकरात लवकर कुडाळ उपविभागीय अधिकारी ( प्रांताधिकारी ) या पदी कार्यक्षम अधिकारी नेमणुकीची मागणी केली आहे.
कुडाळ येथील उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी ) वंदना खरमाळे यांची बदली झाल्याने हे पद गेले काही महिने रिक्त आहे. त्यामुळे प्रशासकीय कामे, सर्वसामान्य जनतेची कामे, शैक्षणिक व इतर दाखले प्रलंबित राहत आहेत.परिणामी सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत असल्याने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे याकडे लक्ष वेधत लवकरात लवकर कुडाळ उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी ) या पदी कार्यक्षम अधिकारी नेमणुकीची मागणी केली आहे.