*कोकण Express*
*कणकवली खरेदी विक्री संघ निवडणुकीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून कोणताच प्रस्ताव प्राप्त नाही*
*योग्य प्रस्ताव आला असता तर नक्कीच विचार केला असता*
*भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली खरेदी विक्री संघाच्या निवडणुकी संदर्भात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून भारतीय जनता पार्टीकडे अजून युती संदर्भात कोणताच प्रस्ताव आपल्याला प्राप्त झाला नसल्याचे भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांनी सांगितले. याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात श्री रावराणे यांनी म्हटले आहे,
बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून कणकवली खरेदी विक्री संघाच्या निवडणुकी संदर्भात आपण भारतीय जनता पार्टीकडे युतीचा प्रस्ताव पाठवला होता असे पत्रकार परिषदेत माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत व संजय आग्रे यांनी सांगितले होते.
त्या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाकडून भारतीय जनता पार्टीला कणकवली खरेदी विक्री संघाचा निवडणुकी संदर्भात अजून पर्यंत कोणताही प्रस्ताव आला नाही. योग्य वेळी व योग्य प्रस्ताव आला असता तर आपण त्यावर नक्कीच विचार केला असता. असेही मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी सभापती मनोज रावराणे यांनी व्यक्त केले.