आदिशक्ती कणकवली महिला समिती आयोजित बालसंस्कृत वर्ग शाळा अन वैश्य समाज कणकवली द्वारा आयोजित

आदिशक्ती कणकवली महिला समिती आयोजित बालसंस्कृत वर्ग शाळा अन वैश्य समाज कणकवली द्वारा आयोजित

*कोकण Express*

*आदिशक्ती कणकवली महिला समिती आयोजित बालसंस्कृत वर्ग शाळा अन वैश्य समाज कणकवली द्वारा आयोजित*

*कणकवली ः प्रतिनिधी* 

बाल संस्कृत वर्ग शाळेमध्ये आपले सर्वांचे स्वागत
आदिशक्ती कणकवली महिला समिती आयोजित बालसंस्कृत वर्ग शाळा अन वैश्य समाज कणकवली द्वारा आयोजित कार्यशाळेचे उदघाटन शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी वैश्यसमाज हॉल (धडाम घराच्या समोर)(पटकी देवी मंदिराजवळ) संध्याकाळी वैश्य समाज कणकवली अध्यक्ष श्री दादा कुडतरकर,श्री महेंद्र मुरकर,सौ नीलम धडाम, दिशा अंधारी,काणेकर, माणगावकर,स।तवसे,कोदे अन अन्य परीवाराचे उपस्थितीत करणेत आले
या वर्गामध्ये वयोगट तीन वर्षापासून पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आहे
या वर्गामध्ये विद्यामंदिर शाळेचे आदरणीय संस्कृत गुरुवर्य श्री वझे सर आपल्या बालचमुना संस्कृत श्लोक संस्कृत शब्द शिकविणार आहेत .तरी मुलांनी तसेच त्यांच्या पालकांनी या दिवशी हजर राहून या वर्गाची शान वाढवायची आहे. हे वर्ग दर शनिवारी घेण्यात येणार आहेत
मुलांना आपली प्राचीन संस्कृती याबद्दल आपुलकीच नव्हे,तर अभिमान वाटावा, आपली धार्मिक तत्वे, वैदिक संस्कृती, आपली परंपरा, सण, धर्मग्रंथ, रामायण, महाभारत मधील महानता संत वाडमय यांचे ज्ञान या वयातच होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे .सर्व पालकांना विनंती आहे की मुलांना या संस्कार वर्गात प्रवेश नोंदणी करून संस्कृत भाषा विकसित व्हावी व जोपासावी यासाठी प्रयत्न करावे,सदरची कार्यशाळा सर्व जातीधर्माना खुली आहे,अत्यल्प फी आकारली जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!