*कोकण Express*
*गोळवण मधून भाजपच्या मालवणातील निवडणूक प्रचाराचा शुभारंभ*
सहाही ग्रामपंचायतींवर विजय मिळवणार ; धोंडू चिंदरकर यांचा विश्वास
*मालवण ः प्रतिनिधी*
जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मालवण तालुका भाजपकडून बुधवारी गोळवण गावातून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे, माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सहाही ग्रामपंचायतींवर विजय मिळवण्याचा विश्वास तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी व्यक्त केला आहे.
आगामी १५ जानेवारीला मालवण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ गोळवण – कुमामे मधून करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, पं. स. सदस्या सौ. सागरिका लाड, सुभाष लाड, पूर्णानंद नाईक, दादा गावडे, अभी गावडे, भाई चिरमुले, शरद मांजरेकर, विरेश पवार, विकास परब, विभा परब, एकादशी चव्हाण, सचिन डिकवलकर, बाबू तेली, तुकाराम जाधव, राजेंद्र गावडे आदी उपस्थित होते.