*कोकण Express*
*120 व त्यावरील हॉर्सपॉवर इंजिनच्या मासेमारी नौकाना युती सरकारकडून डिझेल कोटा मंजूर*
*सिंधुदुर्गासह किनारपट्टीवरील राज्यातील मच्छीमार व्यावसायिकांना मोठा दिलासा*
*आ. नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश ; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मानले आभार*
*सिंधुदुर्ग प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थांना त्यांच्या सभासदांच्या 120 व त्यावरील हॉर्सपॉवर इंजिन नौकांसाठी भाजपा- बाळासाहेबांची शिवसेना युती सरकारने डिझेल कोटा मंजूर केला असून हा सिंधुदुर्गसह किनारपट्टीवरील मच्छिमारांना मोठा दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी आम. नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांनाही होणार असून मच्छिमारांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल युती सरकार तसेच मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी आभार मानले आहेत. याबाबतचा अध्यादेश मत्स्यविभाग खात्याच्या वतीने राज्याचे उपसचिव श्रीनिवास शास्त्री यांनी 14 नोव्हेंबर रोजी काढले आहेत.

