जांभवडे येथील नवजात बालकाच्या उपचारासाठी कै. सिताराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टकडून आर्थिक सहाय्य

जांभवडे येथील नवजात बालकाच्या उपचारासाठी कै. सिताराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टकडून आर्थिक सहाय्य

*कोकण Express*

*जांभवडे येथील नवजात बालकाच्या उपचारासाठी कै. सिताराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टकडून आर्थिक सहाय्य*

जांभवडे तालुका कुडाळ येथील श्री. सुमित चंद्रकांत मडव यांच्या नवजात बालकांवर कोल्हापूर येथे उपचार सुरु आहेत. उपचारासाठी कै. सिताराम ( आबा) सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट जांभवडे बामणवाडीच्या वतीने आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली. सदर ट्रस्टच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात. गरजूंना मदत केली जाते. श्री. रोहित मडव यांच्याकडे ट्रस्टचे सचिव , मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते श्री. वामन तर्फे यांनी आर्थिक मदत सुपुर्द
केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ट्रस्टचे हितचिंतक श्री. अरुण सावंत, श्री. राजेंद्र सावंत, श्री. बबन नाईक उपस्थित होते. यावेळी रोहित मडव यांनी ट्रस्टचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!