आ. नितेश राणे यांनी आंदोलन पुकारल्यानंतरच देवगड जामसंडे शहरांमध्ये धरपकड सुरू झाली. जुगार अड्डे व अमली पदार्थांची विक्री बंद

आ. नितेश राणे यांनी आंदोलन पुकारल्यानंतरच देवगड जामसंडे शहरांमध्ये धरपकड सुरू झाली. जुगार अड्डे व अमली पदार्थांची विक्री बंद

*कोकण Express*

*आ. नितेश राणे यांनी आंदोलन पुकारल्यानंतरच देवगड जामसंडे शहरांमध्ये धरपकड सुरू झाली. जुगार अड्डे व अमली पदार्थांची विक्री बंद*

*….ही सर्व माहिती पोलीस खात्याकडे पहिल्यापासून होती, हे कारवाई नंतर सिद्ध होतंय*

*लवकरच देवगड नगरपंचायतीच्या भ्रष्टाचाराबाबत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देणार…*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड जामसंडे शहरातील जुगार अड्डे व अमली पदार्थांची विक्री बंद करण्याबाबत आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बगळे व त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत माहिती देण्यात आली. आंदोलन पुकारल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये देवगड जामसंडे शहरांमध्ये धरपकड सुरू झाली. जुगार अड्डे व अमली पदार्थांची विक्री बंद करण्यात आली. ही सगळी माहिती पोलीस खात्याकडे पहिल्यापासून होती. हे कारवाई नंतर सिद्ध होत आहे. मग आतापर्यंत हे अवैद्य धंदे शहरातील सत्ताधारी व पोलीस खात्याच्या निवडक अधिकाऱ्यांच्या संगणमताने सुरू होते. हे सिद्ध होत नाही का? आमदारांनी आंदोलन पुकारल्यानंतरच असंख्य बुकी व अमली पदार्थ विकणारे मालक यांना अटक करण्याचे धाडस पोलीस कसे करतात? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे,
दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देवगड व जामसंडे मध्ये असलेल्या अवैद्य धंद्यांविरुद्ध मी आवाज उठविला होता. शहरामध्ये राजरोसपणे चालू असणाऱ्या मटका, जुगार आणि अमली पदार्थांची विक्री या विरुद्ध लढा पुकारला होता. गेल्या दहा महिन्यांमध्ये हे अवैद्य धंदे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले होते की शहरांमध्ये राहणाच्या तरुण-तरुणींचे भवितव्य उध्वस्त होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व प्रकार देवगड जामसंडे नगरपंचायत मधील सत्ताधारी लोकप्रतिनिधी व पोलीस खात्यातील काही निवडक अधिकाऱ्यांच्या संगणमताने सुरू आहेत अशी माहिती माझ्याकडे आहे.

मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याने मला मिळालेली सगळी माहिती नावांसकट देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बगळे व त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवली. मी आंदोलन पुकारल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये देवगड जामसंडे शहरांमध्ये धरपकड सुरू झाली. जुगार अड्डे व अमली पदार्थांची विक्री बंद करण्यात आली. बुकिंना अटक करण्यात आली. पण या निमित्ताने मला पडलेला प्रश्न असा आहे की, ही सगळी माहिती पोलीस खात्याकडे पहिल्यापासून होती. हे कारवाई नंतर सिद्ध होत आहे. मग आतापर्यंत हे अवैद्य धंदे माझ्या माहितीप्रमाणे शहरातील सत्ताधारी व पोलीस खात्याच्या निवडक अधिकाऱ्यांच्या संगणमताने सुरू होते. हे सिद्ध होत नाही का? आमदारांनी आंदोलन पुकारल्यानंतरच असंख्य बुकी व अमली पदार्थ विकणारे मालक यांना अटक करण्याचे धाडस पोलीस कसे करतात? याचे कारण राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना या युतीचे सरकार आहे. गृहमंत्री म्हणून माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब कार्यरत आहेत व गृह खाते सक्षमपणे सांभाळत आहेत. या सगळ्या घटनेची माहिती व निवडक पोलिसांचे अवैद्य धंदेवाल्यांची असलेले संबंध हे नावानिशी मी आदरणीय गृहमंत्री श्री. फडणवीस साहेब यांना देणार आहे. या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री. अग्रवालजी यांनी कार्य तत्परता दाखविली आणि अवैद्य धंदे व अमली पदार्थांचे व्यवसाय शहरांमध्ये खपवून घेणार नाही, असा संदेश माझे समक्ष देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी यांना दिला त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.
मी पोलीस खात्याच्या माध्यमातून चालू असलेल्या कार्यवाहीवर लक्ष ठेवून त्यांना अजून वेळ देण्याचे ठरविले आहे. माझा उद्या जाहीर केलेला मोर्चा मी स्थगित • न करता पोलीस कारवाया कुठल्या दिशेने जातात व शहरांमध्ये किती शिस्त लागते हे बघण्यासाठी मी अजून वाट पाहणार आहे. ज्या दिवशी मला कळेल की अवैद्य धंदे आणि अमली पदार्थांची विक्री शहरांमध्ये परत सुरू झाली आहे. तर मी तारीख जाहीर न करता पोलीस स्टेशन देवगडवर मोर्चा काढीन असा सर्व जनतेला शब्द देतो. तूर्तास इथेच थांबतो लवकरच केंद्र सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये देवगड नगरपंचायतने केलेल्या भ्रष्टाचारा संदर्भात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देणार असल्याने प्रसिद्धी पत्रकातून आमदार नितेश राणे यांनी सांगितले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!