फोंडाघाट महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत उज्वल यश

फोंडाघाट महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत उज्वल यश

*कोकण Express*

*फोंडाघाट महाविद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत उज्वल यश*

*फोंडाघाट ःःप्रतिनिधी* 

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ पातळीवर उज्वल यश प्राप्त केले. मुंबई विद्यापीठ अंतर्गत कुस्ती या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी केली. महाविद्यालयाची प्रचिती तारी ही विद्यार्थिनी कुस्ती या क्रिडा प्रकारात शहापुर येथे आंतर विभागिय पातळीवर खेळण्यास गेली होती त्यात मुलींच्या ५३ किलो वजनी गटात दुसरा क्रमांक पटकावून रौप्य पदकाची कमाई केली.

फोंडाघाटसारख्या ग्रामीण भागातून मुंबई सारख्या शहरात यश मिळवणे हे कौतुकास्पद आहे. या यशाचे कौतुक संस्थेचे चेअरमन सुभाष सावंत, सचिव चंद्रशेखर लींग्रस, खजिनदार आनंद मर्ये तसेच सर्व संचालक महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु फुलझेले, सर्व शिक्षक वर्ग व शिक्षके कर्मचारी यांनी केले. सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्रीडा विभाग प्रमुख प्रा जगदीश राणे यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!