*कोकण Express*
*कणकवलीचा पर्यटन महोत्सव यावर्षी रद्*
*पुढच्या वर्षी दिमाखात साजरा करू, समीर नलावडे…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
येथील पालिकेच्या वतीने घेण्यात येणारा यावर्षीचा पर्यटन महोत्सव कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे,अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज येथे दिली.दरम्यान पुढच्या वर्षी हा महोत्सव दिमाखात साजरा केला जाईल,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कणकवली नगरपंचायत मार्फत गेली दोन वर्ष सातत्यपूर्ण पर्यटन महोत्सव करण्यात येत होता.या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असतानाच कणकवली करांचे मनोरंजनही होते. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने कणकवलीकरांना अनुभवता येत होती.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी हा महोत्सव होणार नाही,अशी माहिती श्री.नलावडे यांनी दिली.