महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून सावंतवाडीत पोलिस भरती कार्यशाळा

महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून सावंतवाडीत पोलिस भरती कार्यशाळा

*कोकण Express*

*महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून सावंतवाडीत पोलिस भरती कार्यशाळा…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

येथील महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर मोफत पोलीस भरती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
यात भरतीसाठी तयारी कशी करावी, लेखी परीक्षा कशी द्यावी, मैदान चाचणी कशी द्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्राउंड व लेखीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ विद्यार्थ्यांना २०२२-२३ ची पोलीस भरती होईपर्यंत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त मुलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक श्री. महेंद्र पेडणेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 90226 86944 / 7350219093 या नंबरवर संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!