तळेरे येथे आरोग्य-रक्तदान शिबिर, शेतकरी मेळावा : सुनिल तळेकर यांच्या 25 व्या स्मृती दिनानिमित्त आयोजन

तळेरे येथे आरोग्य-रक्तदान शिबिर, शेतकरी मेळावा : सुनिल तळेकर यांच्या 25 व्या स्मृती दिनानिमित्त आयोजन

*कोकण Express*

*तळेरे येथे आरोग्य-रक्तदान शिबिर, शेतकरी मेळावा :
सुनिल तळेकर यांच्या 25 व्या स्मृती दिनानिमित्त आयोजन*

*कासार्डे: संजय भोसले*

तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर यांच्या 25 व्या स्मृती दिनानिमित्त आरोग्य शिबिर, शेतकरी मेळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम 25 व 26 नोव्हेंबरला तळेरे येथे होणार आहेत, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेली 25 वर्षे स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावर्षी 25 व्या स्मृतीदिना निमित्त 25 नोव्हेंबर ला सकाळी 10 ते 4 वा. या वेळेत डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने विविध आजारांवर मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे येथे होणार आहे. यामध्ये विविध 15 आजारांवर मोफत तपासणी करण्यात येणार असून 24 नोव्हेंबर पर्यंत तळेरे, दारुम, ओझरम, साळिस्ते, शिडवणे, कासार्डे, वारगाव, गवाणे, बुरंबावडे, शिरवली, नाधवडे येथील प्रतिनिधींकडे नोंदणी करावी. यामध्ये तपासणी करणारया नागरिकांनी पुर्वीच्या आजारांच्या तपासणीचे अहवाल घेऊन यावेत.

शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वा. एस. एस. पी. एम. रुग्णालय पडवे यांच्या सहकार्याने विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय येथे रक्तदान शिबिर होणार आहे. त्यानंतर 10 वा. स्व. सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन राज्य शासनाचे माजी (शिक्षण) संयुक्त सचिव आणि दळवी महाविद्यालयाचे संस्थापक सल्लागार प्रा. विनायक विश्वनाथ दळवी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर 11 वा. शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांसाठी श्री. विठ्ठल रखुमाई मन्दिर तळेरे गावठण येथे शेतकरी मेळावा होणार आहे. यावेळी शेतीमधील तज्ञ मार्गदर्शन करणार असून या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, वाचनालय आणि सुनिल प्रेमीकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!