*कोकण Express*
*गॅसचा भडका उडून स्टॉलमधील साहित्य बेचिराख…*
*कणकवली न. पं.च्या अग्निशामक बंबाव्दारे आग आटोक्यात…!*
*घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुंबई – गोवा महामार्गा लगत जाणवली येथील हॉटेल रिलॅक्स नजिक असलेल्या एका खाद्यपदार्थ विक्रीच्या स्टॉलमध्ये गॅस सिलेंडरची पाईपलाईन लिकेज होऊन आगीचा भडका उडाला. या भडक्यात स्टॉलच्या आतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटने दरम्यान खाद्यपदार्थ बनवत असलेल्या त्या महिलेने प्रसंगवधान राखत त्या ठिकाणाहून बाहेर पडल्या त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हा प्रकार सायंकाळी पाहुणे चार वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेची माहिती कणकवली न.पं.ला मिळताच छोट्या अग्निशामक बंबाद्वारे न. पं. कर्मचारी सदा ताम्हानेकर, सुजन मुणगेकर, सुभाष बिरोडकर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली बंबाच्या साह्याने आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले होते. या घटने नंतर नागरिकांनी स्टॉल जवळ गर्दी करत मदत कार्य केले.

