*कोकण Express*
*डॉ. बाळासाहेब नागरगोजे सिंधुदुर्गचे नूतन शल्यचिकित्सक*
*डॉ. बाळासाहेब नागरगोजे सिंधुदुर्गचे नूतन शल्यचिकित्सक*
*आ.नितेश राणेंच्या यशस्वी पाठपुराव्याने रिक्त सिव्हिल सर्जनपदी नियुक्ती
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नंदापुरकर यांच्या बदलीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर परभणी येथील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक असलेले बाळासाहेब नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक पदावर गेले अनेक महिने डॉ. श्रीपाद पाटील यांची प्रभारी नियुक्ती होती. त्यानंतर डॉक्टर नंदापुरकर यांना या पदावर नियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली होती. त्या मागणीला अखेर यश आले आहे.

