विजय आमचाच..! सर्वच्या सर्व उमेदवार होणार विजयी

विजय आमचाच..! सर्वच्या सर्व उमेदवार होणार विजयी

*कोकण Express*

*विजय आमचाच..! सर्वच्या सर्व उमेदवार होणार विजयी…!*

*खरेदी – विक्री संघ निवडणूक; शिक्षणमंत्री केसरकरांनी बजावला मतदानाचा अधिकार*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

खरेदी-विक्री संघाचा मी सभासद असल्याने मी ही मतदान केलं. परंतु भाजप आणि बाळासाहेबांचे शिवसेना ही एकत्र निवडणूक लढत असून निश्चितच आमचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला. दरम्यान खरेदी विक्री संघ हा जर एक वेगळा उंचीवर नेऊन ठेवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही एकत्र लढत आहोत. तसेच ही निवडणूक बिनविरोध देखील करायची होती. परंतु ती होऊ शकली नाही. त्यामुळे नक्कीच विजय हा आमचा असेल असे केसरकर यावेळी बोलताना म्हणाले. श्री. केसरकर यांनी आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर येऊन आपला आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!