*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खंबीरपणे पाठीशी…*
*राज्य सरकारने सुडभावनेतून केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध…*
*राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
हर हर महादेव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची मोडतोड करून चित्रपट चित्रित केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची चुकीच्या पद्धतीने मांडणी करून चित्रपट चित्रित केला याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला म्हणून राज्य सरकारने त्यांच्यावर सुडाची कारवाई करुन अटक केली,हा छत्रपती शिवाजी महाराज तसेच समस्त मराठा समाजावर अन्याय आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस कधीही सहन करणार नाही,आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या भुमिकेचे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वागत करत असून हिटलरशाही सरकारच्या भुमिकेचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत आहे,तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खंबीरपणे पाठीशी आहे,असे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष श्री अनंत पिळणकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे,