*कोकण Express*
*सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रकाश तेंडोलकरांचा ज्येष्ठ नागरीकांनी केला सत्कार*
*बांदा ःःप्रतिनिधी*
रक्तदान देहदान अवयवदान रुग्णमित्र म्हणून कार्य करणारी “सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही संस्था स्थापन करुन, अनेक रुग्णाचे प्राण वाचवण्याचे कार्य संस्थेमार्फत करत असल्याबाबत तसेच वृद्ध मंडळींसाठीही प्रामुख्याने या सेवा उपलब्ध करुन देत असल्याबद्दल, जागतिक जेष्ठ नागरिक दिना दिवशी, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांचा सावंतवाडी जेष्ठ नागरिक संघा मार्फत “श्रावणबाळ पुरस्काराने” सन्मानीत करुन सत्कार करण्यात आला,यावेळी शाल श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रा.सुभाष गोवेकर यांनी प्रकाश तेंडोलकर यांचा परिचय करुन देताना रक्तदान चळवळ तसेच अनेक सामाजिक उपक्रमा बरोबरच, कवी लेखक असे साहित्यिक, वाचनालय चळवळ असे बहुआयामी व्यक्तिमत्व अशी ओळख करुन दिली, यामुळेच हा सत्कार करण्यात येत असल्याचे सांगितले, तसेच सिंधु रक्तमित्र संस्थेविषयीही माहिती दिली, ही संस्था सिंधुदुर्गातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्रभर अगदी देशपातळीवरही कार्य करते अशी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बी.एन.तेली यांचे हस्ते श्री.प्रकाश तेंडोलकर यांचा सत्कार झाला. यावेळी सत्काराला उत्तर देताना तेंडोलकर यांनी हा जेष्ठांनी केलेला व सर्व जेष्ठांच्या उपस्थितला आजचा हा सत्कार बहुमूल्य असल्याचे सांगितले, यावेळी संस्था संस्थेचे कार्य, देहदान अवयवदान रक्तदान बाबत तेंडोलकर यांनी मार्गदर्शन केले, हा पुरस्कार संस्थेच्या रक्तदान चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांचा आहे, असे प्रतिपादन केले, यावेळी अनेक जेष्ठांनी देहदान व अवयवदान संकल्पही केला, तसेच सिंधु रक्तमित्र संस्थेबद्दल गौरोवोद्गार काढले.
यावेळी जेष्ठ नागरिक संघ, बी.एन.तेली,(उपाध्यक्ष) प्रकाश राऊळ (सचिव),सुधीर धुमे,(सहसचिव), अरुण मेस्त्री (खजिनदार), गुरुदास पेडणेकर, अनंत माधव,सुभाष गोवेकर, दिगंबर पावसकर, सौ.सीमा नाईक, सौ.सुलभा टोरले, सौ.सुप्रिया धुमे, नारायण मालवणकर, तसेच अनेक जेष्ठ सदस्य उपस्थित होते.