*कोकण Express*
*सावंतवाडीत 21 नोव्हेंबर रोजी महारक्तदान शिबिर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सामाजिक बांधिलकी, राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ सावंतवाडी, युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने 21 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.