*कोकण Express*
*कसाल बाजारपेठेत वाहतुकीस अडथळा करणाऱ्या तीन वाहन चालकांवर गुन्हा दाखल*
*सिंधुदुर्ग पोलिसांचा दणका*
कसाल बाजारपेठेत गुरुवारच्या आठवडा बाजार दिवशी सार्वजनिक रस्त्यात वाहन लावून वाहतुकीस अडचण निर्माण केल्याप्रकरणी तीन वाहन चालकांवर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाटा एंट्रा एम एच ०७ ए जे २९३३ हे वाहन बाजारपेठ रस्त्यात उभे केल्याने पोलीस कॉन्स्टेबल एन एन शेळके यांनी गंगाराम धाकल लाबोटे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. हवालदार जी ए पाडावे यांनी मारुती पीक अप एम एच ०७ पी ३५६६ हे वाहन रस्त्यात उभे केल्याने रतीलाल महादेव पोळेकर यांच्या विरोधात फिर्याद दाखल केला आहे. कॉन्स्टेबल वाय आर मुंडे यांनी टाटा टेम्पो एम एच ०७ सी ए ०८७१ हे वाहन रस्त्यात उभे केल्याने प्रशांत तुकाराम खिल्लारी यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा या तिन्ही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.