*कोकण Express*
*कणकवली येथील अनंत राणे उर्फ अण्णा पटेल यांचे वृद्धापकाळाने निधन…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शहरातील मधलीवाडी येथील रहिवासी अनंत साबाजी राणे उर्फ आण्णा पटेल (वय ९०) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. अण्णा पटेल या नावाने ते सर्व परिचित होते. युवासेना कणकवली तालुका समन्वयक तेजस राणे यांचे ते आजोबा होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.