*कोंकण Express*
*कोलगाव येथे जुगारावर पोलिसांची धाड*
*साडे बावीस हजारांच्या मुद्देमालासह पाच जण ताब्यात*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
कोलगाव जत्रोत्सवाच्या परिसरात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून सावंतवाडी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल २२ हजार ६३३ रुपयांचा रोख रक्कम व जुगाराचे साहित्य, मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई काल रात्री कोलगाव-वेताळेश्वर मंदिराच्या परिसरात करण्यात आली, अनिल, नाईक (वय ५५, रा. झिरंगवाडी), शाहिद शेख (वय ३४, रा. कोलगाव-फणसवाडी), दीपक राऊळ (वय ४५, रा. कोलगाव-भोमवाडी), नितेश म्हाडगूत (वय २९, रा. लाडाची बाग-सावंतवाडी), चेतन देऊलकर (वय २९, जुना बाजार-सावंतवाडी) अशी त्यांची. नावे आहेत. ही कारवाई खुद्द उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबतची फिर्याद सचिन कोयंडे यांनी दिली आहे. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांची टेबल जामिनावर मुक्तता करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, मंदिराच्या मागच्या परिसरात असलेल्या जंगल भागात अंधाराचा फायदा घेऊन हा जुगार सुरू होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सचिन कोयंडे, रामदास चव्हाण, सचिन सोनसरकर आदींनी छापा टाकला. त्यात ही कारवाई करण्यात आली. यावेळी काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.