*कोकण Express*
*भावकादेवी युवा प्रतिष्ठान च्या वतीने पडेल येथील श्री भावकादेवी मंदिरा मध्ये प्रथमच भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला*
*देवगड ः प्रतिनिधी*
या वर्षी प्रथमच भावकादेवी युवा प्रतिष्ठान पडेल (वारीकवाडी)च्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेला भव्यदिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला…. यावेळी पडेल गावचे प्रथम नागरिक ( सरपंच )सन्मा. श्री.दीक्षित सर ,माजी.सरपंच अंकुश टुकरल, पडेल हायस्कूल चे मुख्याध्यापक सन्मा.श्री.तानवडेसर,ग्रा.सदस्य श्री.अमित घाडी,भावकादेवी उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री.गणपत वारीक, पदाधिकारी, वाडीतील सर्व लहान थोर नागरिक, गावातील ग्रामस्थ, आणि भावकादेवी युवा प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.. यावेळी महीला भगिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होते.