*कोकण Express*
*वायरी दांडी येथील महिलांचा बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश*
मालवण वायरी दांडी येथील महिलांनी सिंधुरत्न योजनेचे सदस्य तथा उद्योजक किरण सामंत, माजी खा. सुधीर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. नेहा निशाकांत तोडणकर, निकिता नितिन तोडणकर, सायली सुनिल मोंडकर, निर्जरा नामदेव खोबरेकर, ज्योती जगदीश ताेडणकर, राधीका रामचंद्र ताेडणकर, गिरीजा गोपाळ तोडणकर, श्वेता शेखर ताेडणकर, करण ताेडणकर आदींनी यावेळी पक्षप्रवेश केला.
वायरी दांडी येथील उद्धव ठाकरे सेनेच्या या महिला शिवसैनिकांचा पक्षप्रवेश हा ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे. भूषण परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली किसन मांजरेकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश झाला. यापुढे वायरी दांडी येथे अनेक धक्के उद्धव ठाकरे गटाला देत बाळासाहेबांची शिवसेना मजबूत करणार असल्याचे किसन मांजरेकर यांनी सांगितले. यावेळी अरुण तोडणकर, महेश राणे, विश्वास गावकर आदी उपस्थित होते.