*कोकण Express*
*नाधवडे सरपंच पदी शैलजा सुतार यांची बिनविरोध निवड…*
*माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे यांनी केले अभिनंदन…*
भाजपचे बहुमत असलेल्या नाधवडे ग्रामपंचायत नूतन सरपंच पदी शैलजा मनोहर सुतार यांची बिनविरोध निवड झाली. सन 2021 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंच जागेसाठी या आदी आदिती अनिल नारकर यांनी सरपंच पद भूषवले होते. त्यानंतर दुसरी संधी म्हणून नाधवडे नवलादेवीवाडीतील ग्रामपंचायत सदस्य शैलेजा मनोहर सुतार यांना सरपंच पदी बिनविरोध निवड झाली.
नाधवडे गावातील युवा कार्यकर्त्यांनी एकत्र बसून सर्वांना संधी मिळावी म्हणून पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सरपंच पदाच्या मुदतीमध्ये विभागणी करून संधी देण्याचे ठरवले होते. त्यानुसार दोन नंबरची संधी ही शैलेजा मनोहर सुतार यांना देण्यात आली. यावेळी नुतन सरपंच यांचा सत्कार नाधवडे गावातील औदुंबर सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष मनोहर नारकर, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, माजी तालुकाध्यक्ष सुहास सावंत, सोशल मीडिया प्रमुख बाबा कोकाटे, परशुराम ईस्वलकर, महेश गोखले, अनिल नारकर, माजी सरपंच अदिती नारकर, उपसरपंच सूर्यकांत कांबळे, रवींद्र गुंडये, दीपक पार्टे, रमाकांत पांचाळ, संतोष पेडणेकर, संतोष यादव, बाबू तावडे, ग्रामपंचायत सदस्य लीना पांचाळ, ऋतुजा यादव, श्रीरंग पावसकर, गोपाळ कोकाटे, संजय पेडणेकर, रवींद्र मांजरेकर, कपाळे आदी पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.