ओरोस येथे एसटीच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

ओरोस येथे एसटीच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

*कोकण Express*

*ओरोस येथे एसटीच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू*

*ओरोस ः प्रतिनिधी*

मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस-ख्रिश्चनवाडी येथे एसटीची धडक बसल्याने जखमी झालेले पादचारी अनंत पुंडलिक कदम (५४, रा. ओरोस ख्रिश्चनवाडी) यांचे गोवा- बांबोळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. मुंबई-गोवा महामार्ग ओलांडत असताना अनंत कदम यांना कुडाळहून येणाऱ्या एसटी बसची (एमएच-२०/ बीएल-०८७२) धडक बसली. ८ नोव्हेंबरला सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली होती. या अपघातात अनंत कदम गंभीर जखमी झाले होते. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कुणाल कदम यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार एसटी चालक सचिन वामन शेमडकर (४०, रा. हेदूळ, मालवण) यांच्यावर भादंवि कलम २७९, ३३७, ३३८ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जे. आर. वारा करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!