*कोकण Express*
*कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी सिद्धिविनायक मंदिर, मुंबई येथे घेतली खासदार संजय राऊत यांची भेट*
*कुडाळ ःःप्रतिनिधी*
शिवसेनेचे फायरबॅण्ड नेते खासदार संजय राऊत यांना १०२ दिवसांनी जामीन मंजूर झाला. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर थेट त्यांनी सिद्धिविनायक मंदिर येथे भेट दिली. यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी सोबत शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत, संदेश पारकर, संजय पडते, संग्राम प्रभुगावकर, मंदार केणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.