*कोकण Express*
*काँग्रेस ला कणकवलीत झटका – महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस “सोशल मीडिया” सौ गौरी महेश तेली यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गौरी महेश तेली यां राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये गेली कित्येक वर्षे कार्यरत होत्या.त्यांची कुशल कार्यपद्धत लक्षात घेता पक्षाने त्यांच्यावर मोठी जबादारी दिली होती.गौरी तेली यां महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस सोशल मीडिया पदी कार्यरत होत्या.गौरी तेली यां कणकवलीतील समाजसेवक महेश तेली यांच्या पत्नी आहेत. नुकताच त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना यां पक्षात प्रवेश केला असून त्यांचा हा प्रवेश काँग्रेस साठी धक्का मानला जात आहे. कणकवली येथील कार्यालयात माजी खाजदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत तसेच किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला असून बाळासाहेबांची शिवसेना प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते.