*कोकण Express*
*कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा!*
*राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची कणकवली पोलीस निरीक्षकांकडे मागणी*
*नगरसेवक अबीद नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची धडक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर यांनी राष्ट्रवादी च्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केलेल्या मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे,
राज्य मंत्रिमंडळातील वादग्रस्त असलेले मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांची मंत्री पदावरुन हकालपट्टी करा. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तथा संसद रत्न सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत अश्लील टिका करून खासदार सुप्रिया सुळे यांच्या सह देशातील तमाम महिला वर्गाचा अपमान करून संसदीय संविधानाची पायमल्ली केली आहे.,एका संविधानीक घटनेनुसार राज्य मंत्रिमंडळात मंत्री पदावर असणाऱ्या अब्दुल सत्तार यांना ते शोभादायक नाही.,सदर घटना ही लोकशाही प्रधान देशात भूषणावह नाही.,या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांनी केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे निषेध आंदोलन होत आहेत. तसेच अशा बेजबाबदार मंत्र्यांची राज्य मंत्रिमंडळातून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांच्यासह माजी कणकवली राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विलास गावकर, राष्ट्रवादी कणकवली विधानसभा अध्यक्ष डॉ अभिनंदन मालंडकर, कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख़, शहर सरचिटणीस अनीस नाईक, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, माजी युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, माजी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष दिलीप वर्णे, शहर सरचिटणीस विशाल पेडणेकर, शहर चिटनीस गणेश चौगुले, जिल्हा सरचिटणीस सुधाकर कर्ले, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सुंदर पारकर, माजी शिवड़ाव उपसरपंच सतीश पाताड़े, सचिन अडूलकर, आदि उपस्थित होते.