*कोकण Express*
*नाईट लँडिंग- टेक ऑफ लवकरच सुरू चिपी विमानतळावर*
*उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष प्रयत्न*
*मालवण ः प्रतिनिधी*
चिपी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग आणि टेक ऑफ सुरू होणार असल्याची माहिती सिंधुरत्न योजना सदस्य किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांनी मालवण येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मोपा विमानतळामुळे सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ बंद होण्याचा धोका आहे याकडे लक्ष वेधले असता भैय्याशेठ सामंत म्हणाले की चिपी विमानतळ हे हे राज्याच्या उद्योग खात्यांतर्गत येते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विशेष मेहनत घेत चिपी विमानतळावर नाईट लँडिंग आणि टेक ऑफ सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी मेहनत घेतली आहे. यासाठी आमदार नितेश राणे, केंद्रीय मंत्री सिंधिया यांचेही सहकार्य लाभले आहे. नवी मुंबई विमानतळा चे लोकार्पण दृष्टीक्षेपात आहे. नवी मुंबई विमानतळावरून चिपी आणि चिपी ते पुणे अशी कनेक्टिव्हिटी दिली जाईल . त्यामुळे चिपी विमानतळावर आवश्यक असणारी प्रवासी संख्याही पुरेशी मिळून चिपी विमानतळ सुरळीत सुरू राहील असे सामंत म्हणाले.