“ब्रेकींग मालवणी”चा “दीपोत्सव” मान्यवरांच्या उपस्थितीत सावंतवाडीत सजला…

“ब्रेकींग मालवणी”चा “दीपोत्सव” मान्यवरांच्या उपस्थितीत सावंतवाडीत सजला…

*कोकण Express*

*”ब्रेकींग मालवणी”चा “दीपोत्सव” मान्यवरांच्या उपस्थितीत सावंतवाडीत सजला…*

*संस्थानकालीन हनुमान मंदिरात आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून आज ब्रेकींग मालवणी परिवाराच्या माध्यमातून येथील संस्थानकालीन हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाला उत्फुर्त प्रतिसाद लाभला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच हा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कुटीर रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे, युवा उदयोजक तथा भाजपाचे युवा नेते विशाल परब, उदयोजक तथा हनुमान मंदीराचे विश्वस्त शैलेश पई, माजी नगरसेवक विलास जाधव, उदय नाईक, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, महेश गोंंधळेकर, जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढें, ब्रेकींग मालवणीचे संपादक अमोल टेंबकर, ब्युरो चिफ शुभम धुरी, प्रतिनिधी भूवन नाईक, पत्रकार शैलेश मयेकर, सिध्देश सावंत, आनंद धोंड, युवा उदयोजक अनिकेत आसोलकर, सचिन मोजरकर, राकेश कोचरेकर, आनंद काष्टे, सौ.आर्या टेंबकर, ओम टेंंबकर आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम सावंतवाडीचे माजी
नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला होता. या निमित्ताने शहरात सर्वच ठिकाणी दिपोत्सव साजरा करण्यात आला. आपल्या चालीरीती पुजण्याचा हा अनोखा पायंडा असून दरवर्षी हा दीपोत्सव साजरा व्हावा, अशी अपेक्षा यावेळी श्री. साळगावकर यांनी व्यक्त केली. तर संस्थानकालीन शहराचा वारसा पुढे चालवून नेण्यासाठी अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्याचा आदर्श युवा पिढीने घ्यावा, असे युवराज लखम सावंत यांनी सांगितले. तर अशा प्रकारचा अनोखा उपक्रम राबविल्यामुळे युवा पिढीला नवचैतन्य मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!