*कोकण Express*
*मंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल करा*
*राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांची मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अश्लील वक्तव्य केलेल्या मंत्री अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाने कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. मंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लील वक्तव्य करून देशातील महिला वर्गाचा अपमान केला आहे. ही घटना संसदीय संविधानाची पायमल्ली करणारी आहे. राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदावर असलेल्या सत्तार यांना मंत्रीमंडळातून काढण्यात यावे, सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर ,संतोष चव्हाण, उत्तम तेली, जयेश परब, राजू सुतार ,पवन तायशेटे, बाळ मसुरकर ,समीर चव्हाण आदी उपस्थित होते.