*कोकण Express*
*गांधीनगर सरपंचांसह तीन सदस्य भाजपामध्ये ; ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात*
*शिवसेना नेते सतीश सावंत यांना धक्का*
*कणकवली / प्रतिनिधी*
गांधीनगर (भिरवंडे) सरपंच मंगेश अनंत बोभाटे यांच्यासहित आणखी तीन सदस्य सुनीता अनाजी सावंत,सदस्य मंजुषा महादेव बोभाटे, सदस्य प्रसन्ना प्रशांत सावंत व शिवसेना कार्यकर्ते मिलिंद बोभाटे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
येथील ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी त्यांचे भाजपामध्ये स्वागत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, संजना सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, राजू पेडणेकर, समीर प्रभूगावकर, श्यामसुंदर दळवी, संदीप सावंत, आनंद घाडी, सुभाष मलंडकर, रमेश सावंत, विजय सावंत, संतोष सावंत व इतर उपस्थित होते.
सरपंचांसहित आणखी तीन सदस्यांनी भाजपात प्रवेश केल्याने ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आली आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत गावात कोणतेही विकास काम न झाल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे नेतृत्वावर विश्वास ठेवून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण भाजपात प्रवेश केला असल्याचे सरपंच मंगेश बोभाटे यांनी सांगितले.