*कोकण Express*
*उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात*
*मालवण ः प्रतिनिधी*
उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत येत्या ८ आणि ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात बाळासाहेबांची शिवसेनेत अनेक जणांचे पक्षप्रवेश होणार आहेत. यावेळी उद्योजक भैय्या सामंत यांच्या मुख्य उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेचे मालवण पक्ष कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. उद्योजक भैय्या सामंत यांच्या या दौऱ्याबाबत नियोजन बैठक आज मालवण येथे पार पडली. यावेळी किसन मांजरेकर, बबन शिंदे, भूषण परुळेकर, दामू सावंत, महेश राणे, विश्वास गावकर, अरुण तोडणकर, पराग खोत, उल्हास तांडेल, बाबू नाटेकर, राजा तोंडवलकर, ऋत्विक सामंत, अश्विन हळदणकर, दीपक मिठबावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

