भाजप नेते निलेश राणेंचे पुन्हा एकदा दातृत्व दिसले

भाजप नेते निलेश राणेंचे पुन्हा एकदा दातृत्व दिसले

*कोकण Express*

*भाजप नेते निलेश राणेंचे पुन्हा एकदा दातृत्व दिसले*

*वराड येथील निराधार कुटुंबाची घेतली जबाबदारी*

*मालवण ः प्रतिनिधी*

मालवण तालुक्यातील वराड येथील बाळकृष्ण भगत यांचे काही दिवसांपूर्वी दिर्घ आजारपणामुळे निधन झाले होते. यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी या कुटुंबाला आधार देत आर्थिक मदत त्यांच्या पत्नीकडे स्वाधीन करण्यात आली. तसेच पुढे देखील दर महिन्याला काही ठराविक रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे सुद्धा आश्वासन दिले. यानिमित्ताने निलेश राणेंच्या दातृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

यावेळी भाजपचे युवा नेते विशाल परब, सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, शक्ती केंद्र प्रमुख राजन माणगावकर, बबन पांचाळ, डॉ. प्रथमेश वालावलकर, बाळा मसुरकर, जगदीश परब, रुपेश पाटकर, आशिष हडकर, हनुमान सरमळकर, बाळू वराडकर, शुभम मसुरकर तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!