गोवा बनावटीची सुमारे ३५ लाख रुपये किंमतीची दारू जप्त ; कंटेनर सह चालक पोलिसांच्या ताब्यात

गोवा बनावटीची सुमारे ३५ लाख रुपये किंमतीची दारू जप्त ; कंटेनर सह चालक पोलिसांच्या ताब्यात

*कोकण Express*

*गोवा बनावटीची सुमारे ३५ लाख रुपये किंमतीची दारू जप्त ; कंटेनर सह चालक पोलिसांच्या ताब्यात*

*८८१ बॉक्स विविध प्रकारची दारू हस्तगत ; चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई*

*रत्नागिरी ः प्रतिनिधी*

 गोवा बनावटीची सुमारे ३५ लाख रुपये किंमतीची विविध प्रकारची दारू चिपळूण पोलिसांनी मोठ्या धाडसाने पकडली आहे, बेकायदा दारू वाहतूक करणारा कंटेनर आणि चालक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

चिपळूण पोलीस स्थानक येथून देण्यात आलेल्या माहिती नुसार मंगळवार दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे १.४४ वा. कंटेनर क्रमांक एम.एच. १४ एच.जी. ७५२९ ही गाडी गोवा मार्गाकडून मुंबई दिशेने जात असताना चिपळूण पोलिसांना मिळालेल्या विश्वसनिय माहिती नुसार आणि कंटेनर चालकाच्या संशयास्पद हलचालीवरून पोलिसांनी पाठलाग करीत जिल्ह्यातील चिपळूण येथील कळंबस्ते फाटा येथे कंटेनर पकडला‌. यावेळी चालक बाबासाहेब सुखदेव बुधवन वय वर्ष ४४, रा. मोर्शी ता. हवेली, जि. पुणे याला ताब्यात घेतले आहे.

३ लाख ४६ हजार ८९६ रुपये किंमतीची टूबर्ग बियर, २० लाख ९८ हजार १७६ रुपये किंमतीची विस्की असे एकूण ८८१ दारुचे बॉक्स आणि कंटेनर जप्त करण्यात आला असून कंटेनर आणि मुद्देमालाची एकूण किंमत ३४ लाख ४५ हजार ०७२ रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, पोलीस कॉन्स्टबेल दिलीप विठ्ठल जानवलकर यांनी याबाबत चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. चिपळूण पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक आरमाळकर आणि पोलीस या गुन्ह्यांचा अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!