*कोकण Express*
*रास्त धान्य दुकानात सर्वर डाऊन, अनेक गावात धान्य पुरवठ्यापासून नागरिक वंचित*
*सावंतवाडी तहसीलदार यांना मुदत वाढीसाठी दिले निवेदन*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
वरील विषयास अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आपणास सांगू इच्छितो की आनंदाचा शिधा हा रास्त धान्य दुकान वर तसेच धान्य हे वेळेत न आल्यामुळे गेले अनेक दिवस रास्त भाव धान्य दुकान दुकानदारांना धान्य वितरित करणे कठीण झालेले आहे तसेच सर्वरचा प्रॉब्लेम होत असल्यामुळे अनेक त्रुटी निर्माण होत आहे याकरिता आपण आपल्या आपले स्तरावर राज्य सरकार याबाबत पाठपुरावा करून जनतेपर्यंत त्यांचा हक्काचे धान्य वेळेत पोचवावं अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे धन्यवाद कळावे