*कोकण Express*
*धान्य वितरणास मुदतवाढ मिळण्यासाठी तहसीलदार वेऺगुर्ले कडे भाजपा च्या वतीने मागणी*
*वेऺगुर्ले ःःप्रतिनिधी*
संपूर्ण वेऺगुर्ले तालुक्यात सर्व्हर डाऊन असल्यामुळे पाॅज मशिन चालत नसल्याने नागरिकांना धान्य मिळणे कठीण झाले आहे . रास्त धान्य दुकानावर फेरया मारुन गोरगरीब जनता त्रस्त झाली आहे . ३१ तारीख महिन्याचा शेवटचा दिवस आला तरी ६०% लोकांना अजूनही धान्य मिळाले नाही . ही अडचण लक्षात घेऊन भाजपा शिष्टमंडळाने जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार वेऺगुर्ले यांची भेट घेतली. तसेच धान्य वितरणासाठी आठ दिवसाची मुदत वाढवून मिळावी अशी मागणी केली . तसेच आगामी दौऱ्यात नाम.रविंद्रजी चव्हाण यांची भेट घेऊन धान्य वितरणाचा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी भाजपा मार्फत पाठपुरावा करणार असल्याचे प्रसन्ना देसाई यांनी सांगितले .
यावेळी भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख व तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळा सावंत , तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर , तालुका उपाध्यक्ष दीपक नाईक , विश्वनाथ परब , गोविंद परब इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .