*कणकवलीत बाबांचा ४१ वा पुण्यतिथी उत्सव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
येथील परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सव आज भाविक भक्तांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात भालचंद्र महाराज संस्थांकडून पालखी मिरवणुक काढण्यात आली. ज्या रस्त्याने मिरवणूक जाणार त्या रस्त्यावर नागरिकांनी सडा रांगोळी घातली होती.
असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी दिनाचा आज मुख्य दिवस. पहाटे नित्यपूजेने बाबांच्या पुण्यतिथीच्या मुख्यदिवसाची उत्सवाची सुरुवात करण्यात आली. कोरोनाच्या काळात हि अबालवृद्धा सोबतच तरुणांनी सकाळी पहाटे काकड आरती पासूनच हजेरी लावली.