*कोकण Express*
*५ नोव्हें पासून आगामी पोलिसभरती,तलाठी व टेट साठी युनिक चे प्रशिक्षण वर्ग*
*कणकवली ः प्रतिनिधी*
स्पर्धा परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या विविध पोस्ट मधून आगामी मोठी पोलिसभरती , तलाठी आणि टी ई टी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी टेट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता परीक्षा यांची तयारी करण्यासाठी युनिक अकॅडमी कणकवली येथे रेगुलर आणि विकेंड batches चे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस भरती आणि टेट संदर्भात जाहिरात आलेली असून तलाठी भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे. कोकणातील विद्यार्थी हे जाहिरात आल्यानंतर तयारी करतात. जाहिरात आल्यानंतरचा वेळ हा अत्यंत कमी असतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास लवकर सुरु करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळते. विशेष म्हणजे अन्य अधिकारी विद्यार्थ्यांबरोबरच युनिक कणकवली मधून 2019 च्या तलाठी भरती मध्ये तीन तलाठी सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथे कार्यरत आहेत. युनिक कणकवली येथे तज्ञ मार्गदर्शक, माफक फी, नोट्स , टेस्ट सिरीज ,अभ्यासिका,पुस्तके अशा सर्व व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे जाते. सध्या एक वर्ष आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची तीन वर्षाची एमपीएससी batch सुरु आहे तर येत्या ५ नोव्हें २०२२ पासून पोलिसभरती, तलाठी, टेट अशा समकक्ष सर्व पोस्ट करिता रेगुलर आणि विकेंड bachtes सुरु होणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन प्रशासनात यावे असे आवाहन युनिक च्या यशवंत विद्यार्थिनी, कुडाळ न.प.प्रशासकीय अधिकारी आणि साद फाउंडेशन अध्यक्षा गितांजली नाईक तसेच युनिक चे संचालक सचिन कोर्लेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9689414974/9960658458 या नंबरवर संपर्क साधावा.