शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या नियुक्त्या जाहीर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या नियुक्त्या जाहीर

*कोकण Express*

*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या नियुक्त्या जाहीर*

*महिला कणकवली तालुका संघटकपदी वैदही गुडेकर
देवगड तालुका महिला संघटकपदी हर्षा ठाकूर, सायली घाडीगावकर*

*कणकवली ः प्रतिनिधी*

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. खासदार विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक व लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर यांच्या सूचनेनुसार या नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत. यात कणकवली तालुका संघटक पदी कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. तर देवगड तालुका संघटक पदी विभागून निवडी जाहीर करण्यात आल्या असून, देवगड शहर, शिरगाव, मिठबाव, कुणकेश्वर या जि. प. मतदार संघ संघटक पदी हर्षा ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. तर बापार्डे, पुरळ, पडेल, पोंभुर्ले या जि. प. मतदार संघ करिता सायली घाडीगावकर यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत – पालव यांनी दिली. या निवडीबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्वच नेते व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच कुडाळ मालवण मतदार संघाच्या विधानसभा प्रमुख पदी संग्राम प्रभूगावकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. तर सावंतवाडी उपजिल्हाप्रमुख पदी चंद्रकांत कासार, सावंतवाडी तालुका संघटक पदी मायकल डिसोझा यांची निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!