*कोकण Express*
*गडनदीपात्रातील “तो” मृतदेह ओसरगावच्या व्यक्तीचा*
*कणकवली उपजिल्हा रुग्णालयात होते कार्यरत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गड नदीपात्रात आढळलेला तो मृतदेह सध्या कणकवली बिजलीनगर, मूळ- ओसरगाव येथील रविदास तुकाराम चौकेकर (वय ५०) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविदास चौकेकर हे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सफाईगार या पदावर कार्यरत होते. सफाईगार असले तरी मृतदेहांचे पोस्टमार्टम करताना त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असायची. त्यांनी २०१६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. मात्र, त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू नेमका कसा झाला ? याबाबत अधिक माहिती पोलीस घेत आहेत. दरम्या, त्यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. तसेच कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस चंद्रकांत माने, मंगेश बावदने यांनी देखील मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले.