कणकवली गडनदी पात्रात अनोळखी मृतदेह

कणकवली गडनदी पात्रात अनोळखी मृतदेह

*कोकण Express*

*कणकवली गडनदी पात्रात अनोळखी मृतदेह*

*घटनास्थळी स्थानिकांची गर्दी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गडनदी पात्रात येथील कणकवली ते वागदे असलेल्या केटी बादापर्यत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती समजताच हवालदार मंगेश बावदाणे, पोलीस नाईक चंद्रकांत माने, काॅन्सटेबल किरण मेथे, वागदे पोलीस पाटील सुनील कदम आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांचीही गर्दी झाली होती. हुंबरट येथील धोंडू जाधव यांनी पोलिसांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृत पुरुषाचे वय अंदाजे ५० असून अंगावर लाल टिशर्ट व राखाडी ट्रॅकपँट आहे. कदाचित तो नदीपात्रात वाहत येऊन बंधाऱ्याकडे स्थिरावला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. त्यानंतर मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!