*कोकण Express*
*कसाल बाजारपेठेतील दोन दुकानगाळे चोरट्यांनी फोडली*
*कसाल मालवण रस्त्यावर श्री देव काजरोबा मंदिरातील चोरट्यांनी फंडपेटी फोडली होती*
*सिंधुदुर्ग*
कसाल बाजारपेठेतील दोन किराणा दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली .दुकान मालक आपली दुकाने रविवारी सकाळी उघडताना ही बाब उघडकीस आली.अज्ञात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे उघडकीस आले आहे. कसाल मध्ये ही दुसरी चोरीची घटना घडली आहे .या आगोदर कसाल मालवण रत्यावरील हुमरणेवाडी येथील श्री देव काजरोबा मंदीरातील फंडपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचे उघडकीस आले होते. या फंडपेटी मधीलही रोख रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला होता.
कसाल बाजारपेठ येथील वैभव दिवाकर कर्पे, व अमित आनंद म्हापसेकर, यांच्या किराणा दुकानात चोरांनी रविवारी डल्ला मारला. चोर सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहेत. ही दोन्ही दुकाने कसाल बाजारपेठेत एकाच ठिकाणी लगत आहेत दोन्ही दुकानांचे छपराचे पत्रे तोडून चोरट्याने दुकानात आत प्रवेश केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहे.
दोन्ही दुकानातील गल्यातील रोकड व चिल्लर चोरी गेल्याचे उघडकीस आले असुन अधिक तपास ओरोस पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस पोलीस करत आहेत.