*कोकण Express*
*भास्कर जाधव यांना कुडाळ पोलिसांकडून नोटीस*
*कुडाळ ःःप्रतिनिधी*
कुडाळमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात चिथावणीखोर वक्तव्ये केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांना कुडाळ पोलिसांकडून नोटीस आली आहे. याप्रकरणी भाजपने तक्रार दाखल केली होती. यानंतर भास्कर जाधव यांच्या घरी जाऊन पोलिसांनी अटकेसंदर्भातील नोटीस बजावली आहे. भास्कर जाधव यांनी कुडाळमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.
कुडाळमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना एसीबीने संपत्तीसंदर्भात विवरण आणि तपासाला सहकार्य करण्यासाठी नोटीस बजावली होती. याविरोधात महाविकास आघाडीने कुडाळमध्ये काढलेल्या मोर्चाच्या सभेत भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल प्रक्षोभक, चिथावणी देणारी वक्तव्ये केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता कुडाळ पोलिसांनी अटकेसंदर्भातील भास्कर जाधव यांना नोटीस बजावली आहे.