राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा कमिटी सरचिटणीसपदी तळेरे येथील कार्यकर्ते प्रविण वरुणकर यांची निवड

राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा कमिटी सरचिटणीसपदी तळेरे येथील कार्यकर्ते प्रविण वरुणकर यांची निवड

*कोकण Express*

*राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा कमिटी सरचिटणीसपदी तळेरे येथील कार्यकर्ते प्रविण वरुणकर यांची निवड*

*कासार्डे; संजय भोसले*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कमंत्री सतेज उर्फ़ पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी शशांक बावचकर यांच्या सूचनेनुसार तळेरे येथील काँग्रेसचे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते प्रविण अर्जुन वरुणकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

या निवडीबाबतचे नियुक्ती पत्र सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी एमआयडीसी रेस्टहाऊस कुडाळ येथे प्रविण वरुणकर यांना देऊन अभिनंदन केले.यावेळी प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन प्रविण वरुणकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर,जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू,अभय शिरसाट,सुंदरवल्ली पडीयाची,डॉ.मयुर शारबिद्रे,गोविंद कुंभार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!