*कोकण Express*
*कोकण क्राईम न्युज चॅनलच्या वेंगुर्ला कार्यालयाचे ॲड. श्री. प्रसाद करंदीकर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन*
*वेंगुर्ला ःःप्रतिनिधी* गँगचा
आज शुक्रवार दिनांक 28 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी ठीक 11 वाजता श्री. जाफर शेख यांची मालकी व संपादक असलेल्या *”कोकण क्राईम”* या नवीन न्युज चॅनलच्या वेंगुर्ला कार्यालयाचे उद्घाटन लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्री. प्रसाद करंदीकर यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले.
🔸यावेळी कमळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. अविनाश पराडकर, डॉ. कमलेश चव्हाण, कोकण मिडियाचे संपादक व पत्रकार श्री. प्रसाद मडगांवकर, ज्येष्ठ पत्रकार श्री. विष्णू चव्हाण, उद्योजक श्री. राजेश माने, खबरदार कोकणचे ज्येष्ठ पत्रकार श्री. मिलिंद धुरी, सिंधू माझाचे श्री. आनंद कांडरकर, श्री. अक्षय तळवडेकर, सौ. ययाति नाईक, सौ. पायल ढवळे, डॉ. विलास गावडे, श्री. दिनकर चाटे रावसाहेब, श्री. एकेश्वर नाईक, यांच्यासह कोकण क्राइमचे मालक व संपादक श्री. जाफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
या शुभप्रसंगी मान्यवरांनी कोकण क्राईमला शुभेच्छा देताना ‘सिंधुदूर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारी उघड करणाऱ्या न्युज चॅनलची प्रकर्षाने आवश्यकता असताना, या विषयी आवाज उठवणारे पहिले न्युज चॅनल कोकण क्राईमच्या रूपाने श्री. जाफरभाई शेख यांनी सुरू केले आहे. हे कोकण क्राईम न्युज चॅनल आद्य पत्रकार श्री. बाळशास्त्री जांभेकर यांच्या तत्वांवर वाटचाल करत, समाजातील दीन दुबळ्या घटकांना न्याय देत, समाजातील सर्व अपप्रवृत्तींच्या विरोधात सक्षमपणे आवाज उठवत, व सर्व गुन्ह्यांचा पाठपुरावा करत, हे चॅनल अल्पावधीत लोकप्रिय होऊन, यशाची सर्व शिखरे कोकण क्राईमने पादाक्रांत करावीत’, अशा शुभेचछा दिल्या.