*कोकण Express*
*घोणसरी येथे “आनंदाचा शिधा” वाटपाचा शुभारंभ*
*दिवाळी निमित्त शिंदे – फडणवीस सरकार तर्फे वाटप करण्यात आले फराळ साहित्य*
महाराष्ट्रात भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे सरकार येताच गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा सिंधुदुर्ग जील्याह्याचे पालकमंत्री ना.रवींद्रजी चव्हाण यांनी गोरगरीब जनतेसाठी “आनंदाचा शिधा” या दिवाळीनिमित्त देण्याचा घोषित केला होता.या वाटपाचा शुभारंभ घोणसरी रेशनिंग दुकानामध्ये करण्यात आला.१०० रू.मध्ये साखर,रवा,चणाडाळ, गोडातेल प्रत्येकी १ किलो प्रमाणे देण्यात आले.
यावेळी घोणसरी सरपंच सौ मृणाल पारकर,भाजपचे कणकवली तालुका उपाध्यक्ष तथा सोसायटी संचालक मकरंद पारकर,सोसायटी संचालक मॅक्सी पिंटो,भाजपा कणकवली तालुका सोशल मीडिया सदस्य नितीन पारकर,भाजपा माजी बूथ अध्यक्ष कृष्णा पेडणेकर,प्रवीण एकावडे,रेशनिंग दुकानदार साक्षात पारकर, स्मृती पारकर आदि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.