कासार्डे तर्फेवाडी येथील पिंपळेश्‍वर मंदिरात दीपोत्सव साजरा

कासार्डे तर्फेवाडी येथील पिंपळेश्‍वर मंदिरात दीपोत्सव साजरा

*कोकण Express*

*कासार्डे तर्फेवाडी येथील पिंपळेश्‍वर मंदिरात दीपोत्सव साजरा..!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

दिवाळीत लक्ष्मीपूजनाला प्रत्येक जण घरी दीपोत्सव करतो. पण मंदिरातील देवांची दिवाळी साजरी करण्यासाठी कोणालाही वेळ नसतो. त्यामुळे गेल्या कित्‍येक वर्षांपासून तर्फेवाडीतील (ता. कणकवली) पिंपळेश्‍वर मंदिरातील जीर्ण झालेल्‍या मंदिराच्‍या जागी 15 मे रोजी पूजा अर्चा करून जीर्णोद्धार करून मोठया थाटमाटात उद्घाटन करण्‍यात आलेल्‍या मंदिरात दिवे , मेणबत्त्या लावून प्रथमच ख-या अर्थाने दिवाळी साजरी करण्‍यात आली. त्‍यामुळे ह्यावर्षी प्रथमच ग्रामस्‍थांच्‍या वतीने घराप्रमाणे मंदिरातही दिवाळी साजरा करण्‍यात आली.पिंपळेश्‍वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळ तसेच नवचैतन्‍य क्रिडा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने पिंपळेश्‍वर मंदिरात भव्य दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्‍यात आला. देवाची आरती झाल्यावर पुष्प अभिषेक करण्यात आला.यंदा प्रथमच केलेल्या हजारो दिव्यांच्या मंद प्रकाशात मंदिरातील गाभा-या प्रमाणे मंदिर व परिसरही उजळला होता.त्‍यामुळे वाडीत आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथमेश गाडे ,आदित्‍य पाळेकर , रणदिप पाळेकर , संतोष तर्फे , अनिल पाळेकर , ओंमकार कोलते आदिंचे वाडीतील सर्व तरुण मुलाचे सहकार्य लाभल्‍याचे पिंपळेश्‍वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळाचे सचिव दिनेश तर्फे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!