*कोकण Express*
*“रोटरी क्लब ऑफ वैभववाडी “तर्फे दिविजा आश्रम मध्ये दिवाळी साजरी*
*वैभववाडी ःःप्रतिनिधी*
रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने दिवाळीची एक संध्याकाळ दिविजाआश्रम असलदे तालुका कणकवली येथे साजरी करण्यात आली.
देशभर घरोघरी दिवाळी साजरी होत असताना वृद्धाश्रमातील आजी आजोबा मात्र नैराश्याने ग्रासलेले असतात अशावेळी संपूर्ण कुटुंबासहित जाऊन दिवाळीचा आनंद त्यांना द्यावा या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने “दिवाळीची एक संध्याकाळ वृद्धाश्रमाच्या अंगणात” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी आरोग्य तपासणी करण्यात आली. आजी आजोबांसाठी फराळ, भेटवस्तू, धान्य देण्यात आले. यावेळी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांकडून दिवे पेटवण्यात आले व आश्रम परिसरात दीपोत्सव करण्यात आला. दिवाळीचे कंदील लावून फटाके वाजवत गाणी म्हणत दिवाळीची एक संध्याकाळ वृद्धाश्रमात साजरी करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे प्रेसिडेंट संतोष टक्के, सेक्रेटरी संजय रावराणे ,ट्रेझरर प्रशांत गुळेकर व रोटरियन सचिन रावराणे, विद्याधर सावंत , धावले, बंड्या पाटील, सुनील कुंभार , स्नेहल रावराणे, सलोनी टक्के,संजना रावराणे,श्रिया धावले, विजय महाडिक आदी रोटरी परिवारातील सदस्य व डॉ मोरे उभयता उपस्थित होते. वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीम रांबाडे व कर्मचारी उपस्थित होते . वृद्धाश्रमाने ही एक संध्याकाळ आपल्या परिसरात साजरी संधी दिली त्याबद्दल रोटरी क्लबचे वतीने आभार मानून वृद्धाश्रमात यापुढेही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.